वादळवार्ता – गौतम बचुटे
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील शहर वाहतूक शाखेचे पोलीस जमादार मधुकर रोडे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी (ASI) पदोन्नती मिळाली आहे.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या वाहतूक शाखेचे पोलिस जमादार मधुकर रोडे यांना सेवा जेष्ठते प्रमाणे पदोन्नती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी (ASI) पदोन्नती मिळाली आहे.
मधुकर रोडे यांची मागील दोन वर्षांपूर्वी केज पोलीस ठाणे येथून अंबाजोगाई शहर वाहतूक शाखेत बदली झाली. त्यांनी अंबाजोगाई शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान दि. २८ जुलै रोजी रोजी त्यांना सेवा जेष्ठते नुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
त्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या स्वाक्षरीनिशी आदेश निर्गमित झाला आहे. मधुकर रोडे यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचे सहकारी, मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!