विद्यार्थ्यांनी पुस्तकांची भेट देऊन एका स्तुत्य उपक्रमांची सुरुवात केली – प्रिन्सिपल अशोक मस्के
वादळवार्ता/ केज
केज येथील नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनांच्या पवित्र सनानिमित्त एक स्तुत्य उपक्रम हाती घेऊन राखी बांधणार्या बहिनीनां पुस्तकांची दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील नामांकित पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन पवनराजे इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल अशोक मस्के हे होते तर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणुन घुले सर होते प्रथमता इयत्ता १० वी मधील कु. विदिशा गायकवाड , कु. रक्षा ढालमारे , कु. साक्षी चौरे ,कु. ज्याती चौरे,कु. मैथली चौरे, कु किरण केदार, कु. आकांशा जोगदंड ,कु. सोनाली चौरे, कु अपेक्षा पुजारी,कु.अन्तीमा खेडेलवाद यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना राखी बांधुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांस राखी बांधुन रक्षा बंधन हा सन साजरा केला . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना पुस्तकांची भेट देऊन एक स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली . या प्रसंगी एस.एन. चौरे सर , नामदेव मुंडे सर , राऊत सर, मगर सर , शिनगारे सर , विशाल सिरसट सर , डि.एस. चौरे सर , आकुसकर सर आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते . सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आचार्य मॅडम यांनी केले तर आभार राऊत सर यांनी मानले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!