आपला बीड जिल्हाक्राईम

चोवीस तासाच्या आंत विद्युत पंपांचे सुटे भाग चोरणाऱ्या आरोपी केला जेरबंद : सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची धडाकेबाज कारवाई !

वादळवार्ता – गेवराई

तलवडा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी कारवायांचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे चोरटे आणि अवैद्य धंद्यावाल्यांच्या उरात धडकी भरली आहे. शेती पंपांचे सुटे भाग चोरी प्रकरणाचा त्यांनी तपास करून आरोपीला अवघ्या चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या.

या बाबतची माहिती अशी की की, दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० ते १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी विद्युत पंपांचे स्टारर्टर, पंखा आणि रोटर हे सुट्टे भाग चोरून नेले. या बाबत अण्णासाहेब प्रल्हाद गोडबोले यांनी दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तलवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ४२/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरविल आणि अवघ्या २४ तासाच्या आत आरोपी भरत निवृत्ती उमाप याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

या चोरीच्या तपासामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांचे आणि त्यांच्या सहकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अवैद्यधंदेवाल्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. तर शंकर वाघमोडे यांच्या धडाकेबाज कामामुळे पोलीस कर्मचाऱ्यात आत्मविश्वास वाढला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!