केज विधानसभानिवडणुक

केज शहराच्या विकासाच्या शिलेदार आमदार नमिता मुंदडा

केज । प्रतिनिधी

लोकप्रतिनीधी कसा असावा तर तो लोकप्रतिनिधी निपक्षपाती व जनतेच्या हिताचा वा विकासाचा विचार करणारा असावा तरच त्या वस्तीचा ,गावाचा ,शहराचा व तालुक्याचा विकास होतो. बीड जिल्ह्यातील ६ विधानसभेतुन केज विधानसभेत सर्वाधिक विकास निधी खेचुन आणनारा आमदार म्हणजे नमिता मुंदडा.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि केज शहरामध्ये मोठया प्रमाणात विकासाचा आभाव होता त्यामध्ये रस्ते,नाले,पथदिवे, सार्वजनिक स्मशानभूमी वा इतर महत्वपूर्ण समस्यानी केज शहरास विळखा घातला होता. केज नगरपंचायतचे सत्ताधारी याकडे मात्र दुर्लक्षीत करत होते. सदरील समस्याची जाणीव केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांना झाली त्यानी प्रकर्षाने केज शहरातील समस्यानकडे लक्ष दिले. त्या समस्या कशा स्वरूपाने सोडवता येईल यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला व त्या निधीमध्ये अनियमितता होऊ नये म्हणून केज नगरपंचायतकडे न देता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सुपूर्त करून विकासकांमाना सुरुवात केली त्यामध्ये कानडी रोड ,मंगळवार पेठ रोड ,सार्वजनिक स्मशानभूमी सभाग्रह ,फुलेनगरचा रस्ता आदि विकासकामे करून आमदार कसा असावा हे सिद्ध करून दाखवले.म्हणूनच केज शहराच्या विकासाच्या शिलेदार नमिता मुंदडा असं जनतेमध्ये म्हटलं जातंय.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!