केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे शेतकर्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी केज तालुक्यातील शेतकर्यांच्या बांधावर .
सविस्तर वृत्त असे कि केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या शेतातील पिकांची अक्षरशः माती झाली आहे,पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. त्याची प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी केज तालुक्यातील मतदारसंघात माजी आमदार पृथ्वीराज साठे नांदूरघाट,दरडवाडी,बानेगाव, ठोबंरेवस्ती,नारेवाडी,येथे प्रत्यक्ष जाऊन शेतकर्यांशी चर्चा करुण त्यांच्या समस्या जाणल्या तथा शेतकऱ्यांना आधार दिला
अशा संकटात शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत वादळ वार्ताच्या प्रतिनिशी बोलताना व्यक्त केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!