आपले केज

पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे संविधान दिन साजरा

वादळवार्ता वार्तांकन – मुबाशेरोदिन खतीब

भारतिय संविधान दिवस हर्षउल्हासाच्या वातावरणामध्ये पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे साजरा करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि केज येथील पवनराजे इंग्लिश स्कुल केज तथा कै. राम चौरे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रणिताताई चौरे या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक अशोक मस्के सर , वायबसे सर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यांनंतर स्वागत समारंभ कार्यक्रम पार पाडुन इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वायबसे सर व अशोक मस्के सर यांनी आपली मनोगत व्यक्त करुण अध्यक्षीय समारोप मनोगत चौरे मॅडम यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थी सागर याने केले तर आभार मुंडे सरांनी मानले.

या कार्यक्रमास घुले सर , घाडगे मॅडम , शिनगारे सर , गुंड सर , विशाल सर , एस. एन .चौरे रूर , काळे सर , राऊत सर आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!