भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या तालुका सचिव पदि शेख शाकेर यांची निवड करण्यात आली .
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
सविस्तर वृत्त असे कि नेकनुर सर्कलमध्ये निर्भीडपणे पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करणारे शेख शाकेर यांची भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर तसेच प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील , मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुडे यांच्या आदेशाने तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अजय भांगे उपाध्यक्ष साजेद इनामदार सरचिटणीस शाहेद खतीब संघटक मुबोशेरोद्दीन खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सचिवपदी शेख शाकेर यांची निवड करण्यात आली आहे .
त्यांचे आज राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रसंगी सर्व पदाधिकारी तसेच शेख करीम कारबारी,शेख अरशद पत्रकार सिटीजन , शेख रहेमत शेख गुड्डू पत्रकार दैनिक किसान आदि उपस्थित होते तसेच समस्त गावकऱ्याच्या वतीने देखील स्वागत करण्यात आले . शेख शाकेर यांच्या निवडीने सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!