आपला बीड जिल्हाक्राईम

संस्थेच्या सचिवाने बोगस सह्या करून अध्यक्षासह तिघांचे बनावट राजीनामे तयार करून फसविले

सचिवा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील तांबवा येथील कै. यशवंतराव चाटे शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या सचिवाने अध्यक्ष आणि इत्तर दोन सभासदांच्या बनावट सह्या करून त्यांचे राजीनामे तयार केले त्या बनावट कागदपत्रा आधारे राजीनामे मंजूर करून स्वतःची पत्नी, आई व नातेवाईक यांची नेमणूक केली म्हणून त्याच्या विरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बाबतची अशी की, गयाबाई रामधनराव चाटे यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या कै. यशवंतराव चाटे शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा असताना संस्थेचे सचिव शिवाजी भगवानराव चाटे यांनी अध्यक्षा सौ. गयाबाई रामधन चाटे आणि इतर दोघांच्या बनावट सह्या करून त्यांचे बनावट राजीनामे तयार केले. तसेच फेरफार अर्ज तयार करून संस्थेत त्याने स्वतःची आई पत्नी व मामाचा मुलगा यांची संचालक मंडळात वर्णी लावली. याची अध्यक्षांना माहिती होऊ नये म्हणून अध्यक्षा या केजमध्ये राहत असताना; त्यांचा पत्रव्यवहाराचा चुकीचा पत्ता देऊन मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयाची दिशाभूल केली. या प्रकरणी गयाबाई रामधन चाटे यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी केज पोलिस ठाण्यात संस्थेचे सचिव शिवाजी भगवानराव चाटे रा. तांबवा यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी नुसार गुं. र. नं. ४६७/२०२२ भा. द. वि. ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

चौकट

अध्यक्षा आणि सचिव जवळचे नातेवाईक ! :-संस्थेच्या अध्यक्षा सौ. गयाबाई चाटे या सचिव शिवाजी चाटे यांच्या सावत्र चुलती आहेत. मात्र संस्थेवर एकहाती सत्ता राहावी म्हणून सचिवाने त्यांना बनावट स्वाक्षऱ्या करून आई, पत्नी व नातेवाईकांची वर्णी लावली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!