केज सभापतीच्या गावात नागपंचमीच्या दिवशीच पंकज कुमावत यांची दबंग कारवाई ……
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
सविस्तर वृत असे कि केज तालुक्याचे सभापती यांचे गाव असलेले मौजे टाकळी येथे अनेक पिढ्यापासुन नागपंचमी या सणाच्या अनुशंगाने गावामध्ये सणाच्या चार दिवसा अगोदर पासुन जुगार नावाचा खेळ गावातील तसेच इतरचे पुरुष मंडळी खेळत असतात त्याच परमपंरे नुसार या वर्षीही नागपंचमी सणाच्या पहिल्याच दिवशी गावात सुरु असलेल्या जुगारावर केज पोलीसांनी दंबग कारवाई करत जुगार खेळणार्याना ताब्यात घेत मोठा ऐवज जप्त केला असल्याची माहिती समोर येत असुन या कारवाईमुळे केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली असुन जुगर्याचे मात्र धाबे दनानले आहेत.
यामध्ये अनेक धनदांडगे जुगार खेळाडू यांच्या आठरा दुचाकी सह जुगाऱ्यांना ताब्यात घेत केज पोलीस स्टेशन या ठिकाणी आनुन त्यांच्याकडील जप्त केलेली रक्कम ताब्यात घेतली असुन पुढील कारवाई सुरु आहे .
आजच्या टाकळी येथे टाकलेल्या छाप्यामध्ये केजचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिसळे साहेब , पोलिस उपनिरीक्षक पाटील साहेब हेकॉ.थोरात , हेकॉ.जोगदंड ,पोकॉ. सोनवणे ,पोकॉ. आवेज , पोकॉ .बहीरवाळ , पोना. सोपने , पोना .निरडे,पोह. सय्यद,पोह . सानप , पोना.नामदास आणी पोकॉ.इनकर यांच्या टिमने हि कारवाई केली असुन रात्री उशीरापर्यंत पुढील कारवाई केज पोलीस स्टेशन येथे सुरु होती. 
केज पोलीसांचे कौतुक पहाण्यासाठी केज पोलीस स्टेशन समोर लोकांची तोबा गर्दी होती .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!