आपला बीड जिल्हा

भाटुंबा उपोषण ,,,,,,,

संगणक चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या आदेशा नंतर उपोषण मागे

संगणक चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या आदेशा नंतर उपोषण मागे

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

मागील सहा दिवसा पासून केजच्या तहसील कार्यालया समोर मुंदडा समर्थक माजी सभापती आणि सरपंच यांच्यासह नागरिकांचे सुरू असलेले आमरण उपोषण हे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्कालीन ग्रामसेवक यांना संगणक चोरी प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन इतर मागण्यांच्या अनुषंगाने दोन महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचा दिलेल्या लेखी आश्वासना नंतर मागे घेण्यात आले.

केज तालुक्यातील भाटुंबा येथील ग्राम पंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमदार मुंदडा समर्थक माजी सभापती ज्ञानेश्वर चौरे आणि सरपंच सुनिल धपाटे यांच्यासह २५ नागरिक हे दि. १० नोव्हेंबर पासून केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले होते. उपोषणाच्या सहा दिवसानंतर भाजपचे नंदकिशोर मुंदडा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि उपोषण स्थळी उपोषणकर्ते व जिल्हा परिषद बीडचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून भाटुंबा ग्रामपंचायतीचे संगणक चोरी प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक डी ए सोनवणे यांना तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. संगणक चोरीच्या कारवाईचा अहवाल कळवावा. असे लेखी आदेश दिले आहेत. तसेच पेयजल योजना आर. ओ. प्लँट या बाबतचे अभिलेखे, अंगणवाडी बांधकाम, घरकुल ८-अ व बांधकामा बाबत लेखा परीक्षण अहवालाच्या अनुषंगाने नव्याने काही बाबी निदर्शनास आल्यामुळे त्याची संपूर्ण चौकशी दोन महिन्यात पूर्ण करून दोषी विरोधात कठोर कार्यवाही करण्यात येईल. असे लेखी आश्वासन उपोषणार्थींना दिल्या नंतर मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री १०:०० वा. च्या दरम्यान उपोषण मागे घेतले आहे.

एकाच पक्षातील दोन गट आमने-सामने :- भाटुंबा येथील उपोषणकर्ते माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे व सरपंच सुनिल धपाटे हे भाजपा आमदार मुंदडा यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर राम जोगदंड व अरुण धपाटे हे भाजपचे नेते रमेश आडसकर यांचे खंदे समर्थक असल्याचे बोलले जाते. म्हणजे गावगाड्याच्या राजकारणात पक्षा पेक्षाही राजकीय गट महत्वाचा समजला जातो. त्यामुळे केज तालुक्यात मुंदडा गट विरुद्ध आडसकर गट यांच्यातील राजकीय द्वेषाची चर्चा केज मतदार संघात सुरू आहे.

भाजपच्या आंदोलनाकडे पंकजताई आणि खा. प्रीतमताईंनी फिरविली पाठ ! :-भाजपच्या मुंदडा व आडसकर गटातील कार्यकर्त्यांच्या दोन गटातील राजकीय कुरघोडीमुळे जनसंपर्क दौऱ्यावर आलेल्या माजी मंत्री पंकजताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी उपोषणाकडे पाठ फिरवून दुर्लक्ष केले. तर उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे उपोषणास्थळी सतत हजर होते.

बजरंग सोनवणेंची भेट :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी त्याचे सहकारी नगरसेवक भाऊसाहेब गुंड, बालाजी जाधव, बालासाहेब गाढवे, गोपाळ मस्के यांच्यासह उपोषणस्थळी जाऊन मुंदडा समर्थक उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्याची माहिती घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि उपोषणार्थीच्या तब्बेतीची विचारपूस केली. याची राजकीय चर्चा सुरू आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!