वादळवार्ता – केज
केज येथील कानडी रोड वर असलेले सुप्रसिद्ध न्यू इंटेल कॉम्प्युटर्स येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने सेंटर तर्फे नारी सम्मान करण्यात आला असून त्यामध्ये पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक विद्यालय सारणी येथील शिक्षिका सौं उज्वला ताई लोमटे मॅडम आणि स्वामी विवेकानंद विद्यालय सोनीजवळा येथील शिक्षिका सौं अनिता ताई ससाणे मॅडम यांचा त्यांच्या सेवेबद्दल नारी सम्मान करण्यात आला. 
यावेळी जानेवारी 2023 MS-CIT मध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली न्यू इंटेल कॉम्प्युटर्स सेंटर ची विद्यार्थिनी कु प्रतिक्षा विजय मुळे द्वितीय कु मनीषा गणेश कापरे तृतीय कु ऋतुजा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला दिनानिमित्त घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही सत्कार आणि पारितोषिक देण्यात आले.
यनिमित्ताने सौं उज्वला ताई लोमटे मॅडम यांनी महिलांनी भविष्यातील अडचणीवर मात करून आपल्या कुटुंबाला पुढे कशे नेता येईल ते सांगितले. तसेच पुढे त्या म्हणाल्या, कुटुंब सांभाळून तुम्हाला तुमचे करियर बनवायचे आहे तेही सन्मानाने. आणि सौं अनिताताई ससाणे मॅडम यांनी महिला या सर्वात पुढे का जात आहेत याचे उदाहरण देऊन सांगितले.
सूत्रसंचालन सेंटर चे संचालक गणेश सत्वधर तर आभार प्रदर्शन संचालिका सौं विजया सत्वधर यांनी केले.कार्यक्रमासाठी सेंटर मधील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!