आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

उसतोड मजुराच्या शेळ्यांच्या गोठ्याला शॉट सर्कीटमुळे लागली आग; बारा शेळ्यांचा होरपळून मृत्यु

वृद्ध अवस्थेत आर्थिक आधार असलेल्या बारा शेळ्या जळुन खाक

वादळवार्ता वार्तांकन केज

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील हनुमंत प्रिंपरी बरडवस्ती भिमनगर येथील उसतोड मजुर महादेव लोलबा धेंडे वय. 62 वर्ष यांच्या कुटुबांचा उदनिर्वाह संपूर्ण:त शेळ्या वरती चालत होता.

त्यांच्या उपजीवीकेचे साधन केवळ शेळ्यावरती अवलबुन होते.

त्याच्या घराच्याजवळच लहान – मोठ्या बारा शेळ्यांचा गोठा होता. परंतु दि 24 डिसेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजता त्यांच्या गोठ्याला शॉट सर्कीटमुळे आचानक आग लागली आगीने ऐवढा प्रंचड पेट घेतला कि आग विझवता येणे अशक्य झाले .

महादेव लोलबा धेंडे व त्यांच्या पत्नी सैरावैरा धावत आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले परंतु आग विझवता येणे अशक्य झाले होते . महादेव लोलबा धेंडे व त्यांच्या पत्नी शेवटी असाह्य, हाताश झाले व आपल्या उपजिवीकेचे साधन असलेल्या बार शेळ्या आगीच्या प्रकोपात चळत असताना पाहत राहिले. त्यांचे उपजीवीकेचे साधन जळुनखाक झालेमुळे त्यांना आज आधाराची आवश्यकता आहे. त्यांसाठी हनुमंत प्रिप्री येथील तरुणांनी पुढाकार घेवुन आर्थिक मदत करत इतरानीही मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक मदतीसाठी फोन पे , गुगल पे. नंबर 9503353093.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!