आपले केज

पहिल्या रिमझिम पाऊसातच केज नगरपंचायतीच्या स्वच्छतेतुन अस्वच्छता आली समोर

वादळवार्ता – केज

केज नगरपंचायतचा स्वच्छता विभागाचा भ्रष्ट कारभार कांहि केल्या कमी होत असताना दिसत नाही.

याबाब माहिती अशी कि केज नगरपंचायतचा स्वच्छता विभाग यांचा कर्तव्यदक्षपणा हळुहळु केज शहरातील नागरीकांना समजु लागला आहे त्याचे कारणही तसेच आहे. सत्ताधाऱ्यांचा विकास कामाबद्दलचा असणारा अकर्तव्यदक्षपणा. पहिल्या रिमझिम पाउसात झाला उघड केज नगरपंचायतच्या अगदी समोर अंदाजे १०० मिटरच्या अंतरावर, पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारा दर्गा रोडकडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला असणारे नाले तुंबले असल्यामुळे व सर्व घाण, अळ्यायुक्त दुर्गंधी पाणी रस्त्यावर तथा घरात घुसत असल्यामुळे दर्गाकड़े जाणाऱ्या – येणाऱ्या तथा वार्डातील नागरीकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्याचे आरोग्य धोक्यात आले आहे .जर केज नगरपंचायतच्या समोर हि अवस्था असेल तर एकुण १७ प्रभागातील काय अवस्था असेल ? आदि प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडले आहेत.

सदरील घाण नगरपंचायत समोर असल्यामुळे स्वच्छता कर्मचारी आले मात्र वरवरचे काम करुण गेले. 

सर्वसामान्य नागरीक

 

 

 

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!