आपला बीड जिल्हाव्यवसायिकशेतकरी

येडेश्वरी साखर कारखान्याचा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न…

एफआरपी पेक्षा अधिक भाव देणार – बजरंग सोनवणे

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा ९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज चव्हार यांच्या शुभहस्ते पारंपरिक पद्धतीने काटापूजन, गव्हानपूजन करून मोळी टाकण्यात आली. यावेळी येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक श्रीधर (बाबा ) भवर, तज्ञ शेतकरी लालासाहेब पवार, जेष्ठ नेते नवाब मामू, माजी जि.प.सदस्य शंकरआण्णा उबाळे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दादा बोराडे,माजी उपनगराध्यक्ष बबनभैय्या लोमटे, उद्योजक नामदेव (बापू ) खराडे, किशोर (नाना) हंबर्डे, रा.काँ.केजचे तालुकाध्यक्ष नंदूदादा मोराळे, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी ,देशमुख, डॉ.ऋषिकेश भवर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण दादा शिंदे,शिवाजी (बंडू ) चौधरी, उमाकांत (अप्पा )भुसारी, पिंटू ठोंबरे,प्रेमचंद कोकाटे, न.प. केजचे गटनेते भाऊसाहेब गुंड, मुकुंद कणसे, अशोकतात्या तारळकर, विलासआप्पा जोगदंड, पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक, शेतकरी सभासद, बिगर सभासद, अधिकारीवर्ग, कर्मचारीवर्ग, वाहतूक ठेकेदार, तसेच असंख्य शेतकरीवर्ग उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणामध्ये येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे म्हणाले कि, कारखाना पारदर्शक पध्द्तीने चालतोय,या वर्षी 10 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त उदिष्ट असून ते आपण सगळ्याच्या सहकार्याने पूर्ण करणार आहोत.बीड जिल्ह्यात तर सगळ्यात जास्त आपल्या कारखान्याच्या भाव तर नकीच राहणार असून मराठवाड्यात जास्त भाव देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.

यावेळी कारखान्याचे तत्कालीन व्हाईस चेअरमन कै. कल्याण तात्या शिनगारे यांचा उल्लेख करताना चेअरमन सोनवणे भावूक झाल्याचे दिसले. तसेच येणा-या प्रत्येक राजकीय निवडणुकीत मी माझ्या कार्यकत्यासोबत खंबीरपणे उभा आहे. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवणुकीसाठी भावी सरपंच उपसरपंच यांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक येडेश्वरीचे संचालक बाळकृष्ण (बापू) भवर यांनी केले तर ह.भ.प. श्री.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण महाराज चव्हार, श्रीधर (बाबा) भवर, नंदू दादा मोराळे,बबनभैय्या लोमटे यांनी आपले विचार मांडत बजरंग सोनवणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब धायगुडे यांनी व आभार प्रदर्शन सुरज खोडसे यांनी केले .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!