बीड : प्रतिनिधी जिल्हास्तरीय पहिल्या चंपावती महोत्सव 2023 अंतर्गत सहा दिवस विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये बीडची तुलसी इंग्लिश स्कूलची इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत सातवी ते दहावी या मोठ्या गटामधून गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला,चंपावती महोत्सवाचा बक्षीस वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला त्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषक वितरित करण्यात आले. जिल्हाभरातील शाळा चंपावती महोत्सवाच्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, या गीत गायन स्पर्धेत तिने हे यश प्राप्त केले आहे, यापूर्वीही तिने अनेक वेगवेगळ्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावली आहेत, तुलसी इंग्लिश स्कूल येथे शाळेच्या वतीने पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक विजेती आर्या चव्हाण तृतीय पारितोषिक विजेता सम्यक इनकर यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील प्राचार्या उमा जगतकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु.हार्मीका बालाजी जगतकर हिचे सर्व स्तरातून स्वागत, सत्कार अभिवादन होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!