वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यातील साळेगांव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अअश्वारूढ मूर्ती आणि उंट व घोडे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. 
साळेगांव ता केज येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वर्षीची जयंती महाबली ग्रुपच्या वतीने अविनाश उर्फ गजानन इंगळे आणि अमोल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला जेसीबीच्या साहाय्याने पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. मिरवणुकीत विद्युत रोषणाई केलेल्या एका ट्रॅक्टरमध्ये शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती तर दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठित मूर्ती होती मिरवणुकीत डीजे आणि जिजामाता व मावळे यांच्या वेशातील मुले आणि उंटावर आणि घोड्यावर हातात भगवे ध्वज घेतलेले मावळे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत सर्व धर्मीय बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये सरपंच कैलास जाधव, ग्रामपंचायत सदस्य रमेश इंगळे, माजी सरपंच नारायण लांडगे, रिपाइंचे रविंद्र जोगदंड, पत्रकार गौतम बचुटे, संजय इंगळे, सुधाकर इंगळे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. तर शिवजयंती यशस्वी करण्यासाठी अविनाश उर्फ गजानन इंगळे आणि अमोल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष नवनाथ इंगळे आणि त्यांचे सहकारी समाधान माने, विशाल लांडगे, समाधान इंगळे, ऋषीकेश इंगळे, रोशन सरवदे, अमोल इंगळे, संजय इंगळे, दत्ता इंगळे, अविनाश इंगळे, विष्णू इंगळे यांनी परिश्रम घेतले. 
यावेळी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश सानप आणि गोरख फड हे देखील उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!