वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
बँकेतून काढलेले ५० हजार रु. घेऊन गावाकडे जात असताना बँकेच्या बाहेरील रोड वरून दोन अज्ञात व्यक्तीने वृद्धा जवळून पळवून मोटार सायकल वरून पोबारा केला.
या बाबतची माहिती अशी की, दि. १९ डिसेंबर रोजी साळेगांव ता. केज येथील त्रिंबक गित्ते हे दुपारी २:३० ते ३:०० वा. च्या दरम्यान त्यानी कळंब रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्यांच्या खात्यावरील ५० हजार रु. काढले. ते पैसे बँकेतून रोखपाला कडून घेतल्या नंतर त्यानी खाते पुस्तिकेत त्याची नोंद घेतली. नंतर पैसे व पासबुक त्यांनी बनियनच्या खिशात ठेऊन गावाकडे जाण्यासाठी त्रिंबक गित्ते हे बँके समोर केज-कळंब रोडवर उभे असताना कळंब कडून मोटार सायकल वरून दोघे आले. त्या पैकी एकजण खाली उतरला आणि तो अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. त्यांनी त्रिंबक गित्ते यांच्याशी जवळीक साधून बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील ५० हजार रु. व खाते पुस्तिका पळविली. पैसे घेऊन ते दोघे मोटार सायकल वरून पसार झाले.
या प्रकरणी त्रिंबक गित्ते यांनी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला तट नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशा नुसार पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे तपास करीत आहेत.