आवाड ॲकॅडमीच्या १२ विद्यार्थ्यांचा शाहु कॉलेजऱ्या स्क्रीन टेस्ट परिक्षामध्ये जय हो…
आवाड ॲकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्याचा सत्कार
वादळवार्ता – केज
केज शहरामध्ये नामांकित अशी शिक्षणाचे माहेरघर म्हणुन नावरुपास आलेली तथा जय हो हे ब्रिद घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सर्वातपरी प्रयत्न करणारी तथा केज तालुक्यात नावरूपास आलेली ॲकॅडमी म्हणजे अवाड ॲकॅडमी.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि लातुर येथील नामांकित असणारे राजर्षी शाहु कॉलेज ज्या कॉलेमध्ये अँडममिशन मिळविण्यासाठी अख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रयत्न करतात तसेच संबंध महाराष्ट्रातुन राजर्षी शाहु कॉलेजच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी स्क्रिनिंग टेस्ट घेतली जाते सदरील परिक्षा देण्याकरिता दर वर्षी सरासरी ३० ते ३५ हजार विद्यार्थी बसतात पैकी १२० विद्यार्थ्यांची निवड केली जाते यावर्षी १२० पैकी हर्षिता बनसोडे, संयुजा गंलाडे , उन्नती डोईफोडे , वेदांत शिंदे , रोहिनी बारगजे, प्रतीक कावळे, श्रीराम कांबळे , यश सांवत, वेदांत मुळे , ओंकार कवडे , प्राची डावकर , ऐश्वर्या तागड असे एकुण १२ विद्यार्थी आवाड ॲकॅडमीचे यशस्वी झाले असुन त्यांचा गुणगौरव सत्कार IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे डॉ. संगिताताई पिंगळे मॅडम ( रेडिओलॉजिस्ट बीड ),दिपक काका देशपांडे यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी IPS पंकज कुमावत यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून मार्गदर्शन केले. तसेच संगिताताई पिंगळे मॅडम यांनी प्राणायाम विषयी मार्गदर्शक केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. जोशी मॅडमने केले तर आभार आवाड सर यांनी मानले . सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी तथा पालकवर्ग एकत्रित आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आवाड ॲकॅडमीचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!