आपला बीड जिल्हाक्राईम

चारित्र्यावर संशय घेत गरोदर विवाहितेचा छळ : नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा तिच्या नवऱ्याने दारुच्या नशेत शारीरिक व मानसिक छळ करुन दोन लाख रु. माहेरहून घेऊन येण्याची मागणी केली. अशा तक्रारी वरून नवऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील मंदाकिनी हिचा विवाह तीन वर्षा पूर्वी परभणी जिल्ह्यातील वरखेड ता. पाथरी येथील अशोक चौरे यांच्या सोबत झाला. त्या नंतर सुमारे एक वर्षा नंतर अशोक चौरे याने पत्नी मंदाकिनीला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दारू पिऊन बेदम मारहाण करीत असे.

उपाशीपोटी ठेवून तिच्याकडून काम करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असे. दरम्यान दोन महिन्या पूर्वी देखील त्याने दारू पिऊन सहा महिन्यांची गरोदर असलेल्या मंदाकिनी हिला पायावर आणि पाठीवर वेळूच्या काठीने बेदम मारहाण केली.

तसेच माहेरहून दोन लाख रु. घेऊन येण्याची मागणी केली. तिने ही माहिती माहेरी दिल्या नंतर तिचे वडील व चुलते यांनी वरखेड ता. पाथरी येथे जाऊन मंदाकिनी तिचा एक वर्ष वयाचा लहान मुलगा, तिच्या सासू-सासऱ्यांना गप्पेवाडी येथे घेऊन आले. मंदाकिनी हिला अशोक चौरे याच्या पासून एक वर्ष वयाचा आर्यन हा मुलगा असून ती दुसऱ्यांदा सहा महिन्यांची गरोदर आहे.

मंदाकिनी अशोक चौरे हिने दि. २७ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून तिचा पती अशोक चौरे रा. वरखेड ता. पाथरी जि. परभणी याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४१७/२०२२ भा. दं. वि. ४९८(अ), ३२३, ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सिमा निरडे या करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!