विशेष

ग्रामपंचायतीची बँक खाती ; माहिती असायलाच हवी

ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा निधी ठरलल्या उद्देशावरच खर्च करणे बंधनकारक असते . त्यासाठी वेगवेगळी खाती बँकेत काढावी लागतात . त्यावरूनच गावचा सर्वस्तरावरून विकास साध्य होतो .

ग्रामपंचायत खात्यांचा तपशील पुढीलप्रमाणे असतो .

१) ग्रामनिधी : ग्रामपंचायतीचे विविध कर उदा .घरपट्टी , जागाभाडे , व्यवसाय कर , बाजार कर , इत्यादी मधुन येणारा निधी या बँक खात्यात ठेवावा लागतो सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते .

२) ग्राम पाणी पुरवठा निधी : ग्रामपंचायत ने वसूल केलेली पाणीपट्टी या खात्यातच जमा करणे बंधनकारक असते . यातून गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा देखभाल व दुरुस्ती खर्च भागवायचा असतो हे खाते सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते .

३ )वित्त आयोग निधी : १५ वित्त आयोगाकडून ग्रामपंचायत साठी थेट आलेला अनुदान निधी या स्वतंत्र खात्यात जमा होतो आणि वित्त आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच हा निधी खर्च करावा लागतो हे खाते सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते .

४)मनरेगा निधी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे मिळणारे अनुदान या निधीत जमा होत असते यातील निधीमधून ग्राम रोजगार सेवकांचे मानधन इत्यादी खर्च करावा लागतो हे खाते सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते .

५ )ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती निधी : या निधीसाठी मिळालेले अनुदान सात रोग , पोषण ,स्त्रियांचे आजार या प्रबोधन करण्यासाठी तसेच आरोग्य विषयक बाबींसाठी खर्च करणे आवश्यक असते हे खाते सरपंच व आशा सेविका यांच्या संयुक्त सहीने चालविले जाते .

६ )अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजना निधी : जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून प्राप्त होणारा हा निधी वरील प्रमाणेअनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्याविकासासाठी खर्च करावा लागतोहे खाते गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहीने चालते .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!