आपला बीड जिल्हा
उमरी ग्रामपंचायतचा अजब कारभार नाल्या न काढता रस्ता केला, पावसाचे, शौचालयाचे पाणी घरात घुसले
ग्रामस्थ सय्यद आयुब यानी गावचे सरपंच , उपसरपंच याना वारंवार सांगीतले मात्र याकडे दुर्लक्ष केले .

वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
कांहि विकासपुरुष थातुर मातुर विकास करण्याच्या भानगडीत , विकासकामे करतात मात्र ज्यां जनतेसाठी विकास करायचा आहे त्यांना मात्र विसरुन जातात , आणी होत्याच नव्हत होत .
असाच कारभार केज तालुक्यातील उमरी गावामध्ये झालेला आहे . येथील सरपंच उपसरपंच यांनी सिमेन्ट रस्त्याच्यालगत असणारे नाले न करता रस्ता तयार केला , आणी झालं अस कि रस्त्याचे, पावसाचे पाणी उमरी येथील रहिवाशी असलेले सय्यद आयुब यांच्या घरामध्ये घुसले, शौचालयाचा शौच खड्डा पाण्याने भरला आणी तेच पाणी घरामध्ये घुसले आहे .
गावचे सरपंच, उपसरपंच यांच्याकडे सय्यद आयुब यांनी वारंवार विनंती , तक्रार केल्यानंतर देखील याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले .




