आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेची शिंदी गावची यात्रा ; उद्या गाड्या ओढणीचा कार्यक्रम रंगणार

वादळवार्ता – केज

केज तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या इतिहासाचे ठेवा आहे तो ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जोपासण्याचे , जतन करण्याचे कार्य त्या त्या पिढीची जबाबदारी असते. त्यापैकीच शिंदी हे गाव

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातिल शिंदी या गावामध्ये वर्षानुवर्ष भव्य दिव्य अशी यात्रा भरते या यात्रेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात त्यासाठी गावपातळीवरील नागरीक सर्वजाती धर्माला सोबत घेऊन तथा पंचक्रोशील सर्वांच्या सहभागाने एकत्र येऊन यात्रेच्या कार्यक्रमासाठी दिवसरात्र एकत्र कार्य करतात तसा या यात्रेला एक इतिहास आहे . शिंदी गावामध्ये रेणुका मातेचे भव्य मंदिर आहे. अगदी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रेणुका माता यात्रा महोत्सव व पालखी सोहळ्याचे अध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यापैकी चौक भरणे व हळदी लावणे , ह.भ. प. महंत श्री भगवान महाराज शास्त्री वरगावकर यांचा कार्यक्रम तसेच संतोष उबाळे यांचे आराधी मंडळ , त्यानंतर शाहीर विठ्ठल काटे लोककलाकार याचा कार्यक्रम, श्रीमती लताबाई सुरवसे आराधी कार्यक्रम , ह.भ. प. श्री लक्ष्मण महाराज इनामदार ,ह.भ. प. विद्याताई जवळेकर त्याच बरोबर पंचक्रोशीतील अराधी मंडळ असे विविध कार्यक्रम या यात्रेदरम्यान घेतले गेले. या नऊ दिवसामध्ये गावातील तथा पंचक्रोशीतील दात्याकडुन अन्नदान देखील केले गेले.

यात्रेमध्ये गाड्या ओढण्याचा कार्यक्रम

या यात्रेदरम्यान बारा बैलगाड्या ओढण्याची प्रथा आहे. पंचक्रोशीतील बैलगाड्या ओढणारे नऊ दिवसांचा उपवास पकडुन रेणुका मातेच्या मंदीरात बसुन असतात. गावातील चारही बाजुने असणाऱ्या देवस्थानाला श्रीफळ फोडून गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सकाळी ८.१५ वाजता सुरु होऊन ४ वाजेपर्यत चालतो या दरम्यान पंचक्रोशीतील हजारो भाविक एकत्र येऊन रेणुका मातेचे आर्शीवाद घेतात . उद्या म्हणजेच ६ एप्रिल रोजी हजारो भक्त यात्रेस भेट देतात. 

तसेच दि ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल ह.भ.प. श्रीराम महाराज शेळके मोरडकर यांचा किर्तननाच्या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आणी ऐतिहासिक रेणुका मातेची पालखी आणी छबीना रात्री ९ वाजता निघण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या आगळ्या वेगळ्या ऐतिहासीक पद्धतीने चालणाऱ्या यात्रेचे स्वरूप फार सुंदर पद्धतीने यावर्षी साकारण्याचे कार्य अध्यक्ष अमर पाटील शिदीं गावच्या ग्रामस्थांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!