चेअरमनपदी बालासाहेब(दादा) बोराडे तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांची बिनविरोध निवड
दैनिक वादळ वार्ता/केज
केज तालुका खरेदीविक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या ताब्यात आली असून बजरंग सोनवणे यांचेच वर्चस्व कायम राहिले असून चेअरमन पदी जेष्ठ नेते बालासाहेब (दादा) बोराडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
केज येथील खरेदी विक्री संघावर बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात आहे. दरम्यान आताच झालेल्या बिनविरोध निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सन २०२४-२९ च्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीत संघावर संस्था मतदार संघातून उमेदवार विश्वास शिवाजीराव पाटील, गोपीनाथ वामनराव इनकर, डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे, अशोक गोविंदराव नेहरकर, महानंदा श्रीराम सोनवणे हे, वैयक्तिक मतदार संघातून बालासाहेब पंढरीनाथ बोराडे, बजरंग मनोहर सोनवणे, प्रकाश तुकाराम थोरात, दिलीप रामकृष्ण गुळभिले, नितीन धनराज नेहरकर हे, अनुसूचित जाती किंवा जमातीतील सदस्य म्हणून बाळासाहेब एकनाथ निशिगंध, महिला प्रतिनिधीतून विमल श्रीहरी जाधव, वंदना बाळासाहेब जाधव तर विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीयातील सदस्य म्हणून दत्तात्रय येडू ठोंबरे हे तर इतर मागासवर्गीय सदस्य म्हणून दिलीप दत्तात्रय गोरमाळी हे बिनविरोध निवडून आले आहेत.
या संचालकांच्या बैठकीत चेअरमनपदी बालासाहेब बोराडे तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडी बद्दल बजरंग सोनवणे यांनी दोघांचेही अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!