आपला बीड जिल्हाक्राईम

ट्रॅक्टरसाठी विवाहितेचा छळ : नवरा व सासू सासऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील एका विवाहितेचा तिच्या सासरी धारूर तालुक्यात ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये; म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिच्या सासरच्या लोकां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील केज येथील चित्रकला लखन भालेराव वय (३० वर्ष) हिला तिच्या सासरी चोरंबा ता. धारुर येथे सासरच्या लोकांनी ती चांगली वागत नाही असे म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रु. घेवुन ये म्हणून तिला घराबाहेर काढले. अशा तक्रारी वरून चित्रकला भालेराव हिच्या तक्रारी वरून तिचा नवरा लखन शेषराव भालेराव, सासू आशाबाई शेषराव भालेराव, सासरा शेषेराव मसाजी भालेराव आणि मसाजी शेषेराव भालेराव, विशाल शेषेराव भालेराव सर्व रा. चोरंबा ता. धारुर यांच्या विरुद्ध गु. र. नं. ४४३/२०२२ भा. दं. वि. ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस जमादार जसवंत शेप हे करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!