आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

दोन दुचाकींची जोराची धडक ; तिघे जखमी 

वादळवार्ता – केज

रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावर चिंचोलीफाटा येथे सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. एकावर बीडच्या रुग्णालयात तर दोघांवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

     केज तालुक्यातील चिंचोली ( माळी ) येथील पंडित शिवाजी गालफाडे ( वय २८ ) हा तरुण गुत्तेदार चंद्रकांत बिक्कड यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. तो सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास केजहून गावाकडे दुचाकीवरून ( एम. एच. ४४ पी. ५४५४ ) जात असताना केज – कळंब रस्त्यावरून चिंचोलीफाटा येथून रस्ता ओलांडत होता. याचवेळी लव्हुरी येथील श्रीराम अशोक चाळक ( वय २३ ) व दीपक बालासाहेब वायकर ( वय २५ ) हे दोघे दुचाकीवरून ( एम. एच. ४४ व्ही. ६०९५ )  कळंबकडून भरधाव वेगात केजकडे येत होते. त्यांच्या दुचाकीने पंडित गालफाडे याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पंडित गालफाडे याच्या पायाला गंभीर मार लागला असून श्रीराम चाळक, दीपक वायकर हे दोघे जखमी झाले. पंडित याच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू असून श्रीराम व दीपक या दोघांना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

Individuals that purchase manufactured houses have made a commitment to their clients to offer great service. They recognise that selling a property may be an emotional experience, therefore they will do all possible to make the process as seamless as possible. Working with a mobile home buyer might be a fantastic choice if you want to sell your mobile home fast and without difficulty. To know more about the service, visit https://www.mobile-home-buyers.com/oklahoma/sell-my-mobile-home-skiatook-ok/.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!