धरणावरील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा शिवाजी ठोंबरे यांनी केला सत्कार
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

बीड जिल्ह्या सह महाराष्ट्रात महत्वाचे आणि चर्चेत असणारे मांजरा धरण हे सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने म्हणजेच १००%भरल्याने बीड सह लातूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.व या मांजरा धरणाचे जलपूजन छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे यांनी दि.०६नोव्हेंबर रविवार रोजी करून मांजरा धरणावर दिवसरात्र मेहेनत घेऊन कर्तवदक्ष पणे कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण हे सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरलेले आहे त्यामुळे जलपुजनाचा कार्यक्रम छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला व मांजरा धरणा वरील चोवीस तास जिव मुठीत धरुन कार्य करणाऱ्यां सर्व कर्तव्यदक्ष कर्मच्याऱ्यांचा सत्कार करण्यात आला व त्याची आस्थेवाईकपणे चोकशी केली धरण बीड जिल्ह्यातील व केज तालुक्यातील आसुन पुर्ण फायदा लातुर जिल्ह्याला होत आसुन धरण आमचा उशाला कोरड घशाला आशी अवस्था झालेली आहे कारणं या धरणाचे पुर्ण फायदा व अधिकार लातुरला आहेत हे अधीकार बिड जिल्हाला सुद्धा देण्यात यावेत अशी मागणी छावाचे जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी केली.
यावेळी मांजरा धरणाचे कर्तव्यदक्ष लेखापाल
विकास ठोंबरे साहेब,कळवणे साहेब,यांच्या सह मांजरा धरणावरील कर्मचार्यांनाचा सत्कार छावा च्या वतीने शिवाजी दादा ठोंबरे यांनि केला .यावेळी मांजरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण खोडसे पत्रकार दत्तात्रय मुजमुले मांजरा धरणाचे प्रकल्प लेखापाल विकास ठोंबरे,कालवणे साहेब, निरीक्षक वाघमारे पोलीस कर्मचारी देवा कांबळे,सिद्धार्थ पोटभरे,परमेश्वर गुजर, राहुल ईनकर, हामीद शेख यांच्या सह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्तिथीत जलपूजन कार्यक्रम व कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन झालं.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!