वादळवार्ता – केज
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर , कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे, उपाध्यक्ष अँड.घाईतिडक सरचिटणीस मुबशीर खतीब तथा केज तालुका अध्यक्ष रमेश गुळभिले यांच्या बैठकीनंतर केज येथे वास्तव्यास असणारे प्रेमजीत हजारे यांची केज तालुका सह प्रचार प्रमुख म्हणुन निवड करण्यात आली आहे .
निवडी नंतर प्रेमजीत हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, माहिती अधिकार फेरडेशनची संपूर्ण नियम अटी व आचारसंहिता यांचे काटेकोरपणे पालन करून या पदावर जबाबदारीने काम करीन या पदाचा कुठलाही गैर वापर करणार नाही सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत प्रेमजीत हजारे यांनी व्यक्त केले आहे.
या निवडीनंतर केज तालुक्यातील मित्र परिवारा कडून अभिनंदन केले जात आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!