Uncategorized

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची जुगार आणि अवैद्य दारू विरुद्ध धडक कारवाई

वादळवार्ता – गौतम बचुटे

गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि त्यांच्या टीमने अवैद्य दारू व जुगारावर धडक कारवाई केल्याने अनेकांच्या उरात धडकी भरली आहे.

तलवडा ता गेवराई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ जुलै रोजी त्यांच्या पोलीस पथकाने तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सिरसदेवी गावातील गढी ते माजलगाव जाणारे रोडवर हॉटेल राजमुद्रा या हॉटेलच्या पाठीमागे धाड टाकली. त्यावेळी एक व्यक्ती हा विनापरवाना बेकायदेशिरीत्या देशी दारू बाळगुन तीची चोरटी विक्री करीत होता. त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून सुमारे ११२० रु. च्या १६ दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. तर आरोपी तेथुन पळून गेला.

पोलीस नाईक शरद भारती यांच्या फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदा ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कोरडे हे करीत आहेत.

तसेच ठाकर आडगाव येथे एक व्यक्ति हा विनापरवाना बेकायदेशीररित्या चित्रावर पैसे लावून सोरट नावाचा जुगार खेळत व खेळवित होता. पोलिसांनी त्यावर धाड टाकून जुगाराचे साहित्य व नगदी ८०० रूपये ताब्यात घेतले.

या प्रकरणी विठ्ठल चव्हाण यांच्या फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध मुंबई जुगार कायदा १२(ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!