Uncategorized

शालेय विद्यार्थ्यांचे दररोज होत आहे  ” उडी मारो अंदोलन “

वादळवार्ता – केज दि.१६ वार. रविवार

केज शहरातील रस्त्यांची, नाल्यांची , स्वच्छतेची अवस्था हि गंभीर समस्या प्रत्येक प्रभागामध्ये वरती तोंड काढत असुन प्रभागातील नागरिक समस्या निवारण करण्यासाठी केज नगरपंचायतला खेटे मारत आहेत परंतु सत्ताधारी मात्र अर्धवट विकास करून तथा नगरपंचायतच्या कर्मचारी यांना हाताशी धरून मलीदा लाटत आहेत.

या बाबत वृत्त असे की केज मधील कानडी रोडच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खाजगी शिकवणुकीचे वर्ग सुरु आहेत. त्यामध्ये इयत्ता ५ वी पासुन ते इयत्ता १० वी पर्यंत असणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने याच रोडने ये-जा करतात. याच रत्यावर असणारे देशमुख कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजुस असणाऱ्या वीस फुटाच्या रस्त्याच्या सुरुवातीला नाल्यावरती असणारा पुल साधारण पाठीमागील ८ दिवसांपासुन निकृष्ट कामामुळे पडलेला आहे. यामुळे शाळेय विद्यार्थ्याना हाच रस्ता ये-जा करण्यासाठीचा असल्यामुळे जीव मुठीत धरून नाल्यांवर उडया मारुण जावे लागत आहे. परंतु केज नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना सदरील बाब हि गंभीर वाटत नसल्यामुळे वा विद्यार्थ्यांच्या जिवाची परवा नसल्यामुळे सदरील पुल दुर्लक्षित पडलेला आहे.

यामुळे झोपेचे सोंग घेतलेले सत्ताधारी वा प्रशासन जागे होईल का ? पुलामुळे विद्यार्थ्यांन सोबत कांही अपघात झाला तर केजचे सत्ताधारी याची जिम्मेदार घेतील का ? ” उडी मारो आंदोलन बंद होईल का ? आदि प्रश्न शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना पडले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!