आपला बीड जिल्हा

केज नगरपंचायत अंतर्गत उमरी रस्त्यासाठी आला 98 लक्ष रुपयांचा निधी ; प्रत्यक्षात कामे कधी सुरु होणार ?

मुख्याधिकारी साहेब जरा ईकडे लक्ष द्या !

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

प्रत्येक नेता विकासासाठी झटतो सरकारला गावचा शहराचा विकास करण्यासाठी निधी द्यायला भाग पाडतो. त्यामधुन साधला जातो तो विकास केव्हां दिसतो तर केव्हां कागदावरच असतो.

केज नगरपंचायत अंतर्गत येणारा उमरी रस्ता तसे उमरी रस्त्यासाठी सर्वात जास्त अंदोलने झाली आहेत हे केज शहरातील नागरीकांनी प्रत्यक्षात पाहिली आहेत.

नागरीकांच्या वेळोवेळी अंदोलनामुळे मुख्याधिकार नगरपंचायत केज यांनी सन 2020/2021 अंतर्गत नागरी दलीत्तेतर वस्त्यामध्ये सुधारणा करणे या योजने अंतर्गत क्रॉक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी रक्कम 1,33,00000 एक कोटी तेहतीस लक्ष रुपये चा अंदाजपत्रकीय रक्कमेचा प्रस्ताव सादर केला होता .

नगरपंचायत प्रशासकीय आदेश 18/10/2021 प्रमाणे त्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 8 मध्ये दोन रस्त्यासाठी 35,00000 लक्ष रुपये निधी तर उमरी रस्त्याकरिता उमरी रस्ता मजबुतीकरण व सिमेंट कॉक्रीट बांधकाम करणे यासाठी एकुण 98,00000 लक्ष रुपये निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असुन मात्र केज नगरपंचायतच्या सुस्त व ढिसाळ कारभारामुळे कार्यालयीन प्रक्रिया जाग्यावर थांबल्या आहेत. त्याला गति येत नाही किंवा जानुन बुजुन गति दिली जात नाही.

ज्याच्यावर केज शहरातील जनतेचा विश्वास आहे असे नवनिर्वाचीत आलेले मुख्याधिकारी हजारे साहेब ज्याच्याकडे दोन अतिरिक्त पदाचा कारभार आहे ते वेळ काढुन याकडे लक्ष देतील का ? सत्ताधारी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या उमरी रस्त्याचे कामे सुरु करतील का ? विकासाला गति देतील का? कि परत आंदोलन रस्त्यासाठी आंदोलन करावे लागेल ? असे विविध प्रश्न केजकरांच्या माध्यमातुन उपस्थित केले जात आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!