क्राईम

सचिन कांबळे मृत्यू प्रकरणी एक आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज येथील कानडी रोडवर अज्ञात इसमाच्या मारहाणीत डोक्यात झालेल्या जखमामुळे एका युवकाच्या मृत्यू प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ७:०० वा च्या सुमारास सचिन कांबळे व त्याचा मित्र मुन्ना शिंदे हे दोघे मुन्ना शिंदे हे दोघे कानडी रोडने जात असताना रंगोली कलेक्शन समोर एका अनोळखी इसमा सोबत त्यांचे भांडण झाले. त्या इसमाने सचिन कांबळे याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले.

त्या नंतर जखमी सचिन कांबळे याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी केज येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून परत घरी आल्या नंतर दि. १ ऑगस्ट रोजी पहाटे ३:०० वा. च्या त्याला पुन्हा त्रास होत असल्याने पुन्हा त्याला केज येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले. मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सचिन कांबळे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते.

या प्रकरणी मयत सचिन कांबळे यांची आई पौर्णिमा यशवंत कांबळे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात दि. २ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुं. र. नं. ४६६/२०२३ भा दं वि ३०४ प्रमाणे सचिन यशवत काबळे यास दगडाने डोक्यात मारून, त्यास जखमी करून झालेल्या गंभीर दुखापतीमुळे सचीन कांबळे मरण पावला. त्याच्या मृत्यूस मारहाण करणारे अज्ञात कारणीभूत असल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी घटनास्थळाचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला आणि मारहाणीच्या वेळी मयता सोबत असलेला शिंदे याला विश्वासात घेऊन बारकाईने आणि कसून तपास केला. त्याने सांगितलेल्या वर्णना वरून मारहाण करणारा इसम हा नागझरी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते व पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे नागझरी ता. धारूर येथे गेले. पोलीस गावात आल्याचे समजताच संशयित आरोपी अण्णा निवृत्ती चौरे हा पळून गेला आणि डोंगरावरील शेतात लपून बसला होता.

त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते व बाळासाहेब अहंकारे यांनी डोंगरावर पायी जाऊन तो संशयित आरोपी गाफील असताना मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!