आंदोलनआपला बीड जिल्हा

अक्षय भालेराव खून प्रकरणी बीडमध्ये तीव्र संताप

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंबेडकरवादी पक्ष-संघटनेचे भव्य निदर्शने…

वादळवार्ता – बीड (प्रतिनिधी)

बोंढार जिल्हा नांदेड येथील अनुसूचित जातीचा अक्षय भालेराव याची गावामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढलीच कशी? याचा राग मनामध्ये धरून जातीय मानसिकता असणाऱ्या लोकांनी लग्नाच्या वरातीच्या आडून निष्पाप असणाऱ्या अक्षय भालेराव याचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्ष, संघटनेच्या वतीने अक्षय भालेराव खून प्रकरणी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत .

सदरील प्रकरणांमध्ये सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, कुटुंबीयास पन्नास लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे, गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलीस चौकीची स्थापना करावी, तसेच सर्व आरोपीची मालमत्ता जप्त करण्यात यावी यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करत मा. प्रधान सचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई यांना जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रवी वाघमारे, आशिषकुमार चव्हाण, अजय सरवदे, अनिलजी तुरुकुमारे, संदीप जाधव, प्रशांत ससाने, प्रमोद शिंदे, संगीताताई वाघमारे, अरुणाताई आठवले, अनिताताई डोंगरे, दीपक कांबळे, धम्मपाल विद्यागर, सनी आठवले, बाळासाहेब काकडे,राजू कांबळे, नितीन सोनवणे, रजनीकांत वाघमारे, विनोद सवाई, गौतम इनकर, अशोक प्रधान, अमोल अहिरे, नितीन जोगदंड, अशोक काकडे, सिद्धार्थ जोगदंड, अशोक हुंबरे, शांतिदूत घोडके, धीरज वाघमारे, विशाल सोनवणे, आकाश वाघमारे, लखन जोगदंड, मिलिंद सरपते, विजय चांदणे, अशोक गायकवाड, संतोष जोगदंड, नितीन मुजमुले, अमोल चंदनशिव, प्रवीण टाकणखार, अमोल धनवे, भारत कांबळे, अक्षय कोकाटे, हर्षद वाघमारे, चेतन पवार, सुधीर कथले, युवराज औसरमल, श्रीकांत वाघमारे, प्रेम कांबळे आदी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!