आपला बीड जिल्हाक्राईम

परत तिर्रट खेळणार्‍यावर पोलिसांची धाड ; सपोनि शंकर वाघमोडे यांची दबंग कारवाई

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील समाज मंदिरा जुगार खेळणाऱ्या चार जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली.

केज तालुक्यातील साळेगांव येथील समाज मंदिरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सोमवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वा. च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशा वरून पोलीस नाईक राजू गुंजाळ आणि पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी अचानक धाड टाकली. त्यावेळी निखील रमेश गायसमुद्रे, भैय्या विष्णु बचुटे, सय्यद इस्माईल गफुर आणि जालींदर भानुदास सरवदे हे चौघे तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य आणि नगदी रोख १ हजारे ९०० रु. असा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांच्या फिर्यादी वरून निखील रमेश गायसमुद्रे, भैय्या विष्णु बचुटे, सय्यद इस्माईल गफुर आणि जालींदर भानुदास सरवदे या चौघांच्या विरुद्ध गु. र. नं. ५२५/२०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधकअधिनियम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!