केज-बीड महामार्गावर सारुळ फाट्यावर झालेल्या पीक-अप आणि कारच्या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला.
या बाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वा. च्या दरम्यान महेश बहादूर पुरी वय (२५ वर्ष) हा पिक-अप क्र. (एमएच-२३/ एच-९०३०) चालवीत सारुळ कडून केज-बीड या महामार्गाने नांदूर फाट्याकडे जान्यासाठी वळत असताना त्याला बीडकडून केज मार्गे धारूरकडे जात असलेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने क्र. (एमएच-२५/आर/७०१२) ने जोराची धडक दिली. पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाले. यात पिक-अप चालक महेश बहादूर पुरी वय (२५ वर्ष) याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
या अपघाता नंतर त्याला खाजगी वाहनाने बीडकडे दवाखाण्यात घेऊन जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने सरकारी वाहनाने पोलीस नाईक अशोक मेसे, शेख रशीद आणि हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी हजर झाले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!