वादळवार्ता – केज
गावचा सर्वांगुन विकास व्हावा या करिता मतदार निवडणुकीच्या माध्यमातुन प्रशासनाकडुन पाठपुरावा करण्यासाठी तथा लोकशाही बळकट करण्यासाठी विश्वासपूर्ण व्यक्तिला निवडुन देतो. नव्हे तर तो आपले स्वातंत्र्य त्या व्यक्तिला बहाल करतो मात्र याच लोकशाहीत एका निवडुन दिलेल्या सरपंचाला इतरासह आत्मदहन करण्याची वेळ येत असेल तर हि बाब दुर्दैवीच म्हणावे लागेल.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील मौजे सोनेसांगवी येथे पाठिमागील १२ दिवसांन पासुन आरध्या गावची विज खंडित झाली आहे. या गावचे सरपंच मुंकूद कनसे यांनी याबाबत वेळोवेळी केज तथा अंबाजोगाईच्या एमएसईबीच्या अभियंतासह इतर कर्मचारी यांना कळवले होते त्याबरोबरच पाठपुरावा करण्यासाठी एमएसईबीच्या कार्यालयाचे खेटे मारले मात्र सदरील सरपंचाची कसल्याही प्रकारे दखल घेतली गेली नसल्यामुळे वैतागुन या सरपंचाने केज तहसिल कार्यालयात एक निवेदन सादर करून त्यावर सिंगल फेज २५ KVA ट्रान्सफार्मर लवकर दयावा ,गाव अंतर्गत सिंगल फेज डिपी ची आविंग नव्याने करण्यात यावी ,डोमाली गाव अंतर्गत विद्युत L. T. लाईनच्या खराब असलेल्या तारा बदलाव्यात , विद्युत L.T. लाईनच्या ढिल्या झालेल्या तारा तंग कराव्यात तसेच विद्युत LT. लाईनचे इनलाईन पोल टाकावेत व सर्व सिंगल फेज डि पी. वर २५ KVA ट्रान्सफार्मर बसवावेत आशा स्वरूपाच्या मागण्या केल्या आहेत. जर यावर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर दि ०८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचाय सोनेसांगवी येथे सामुहिक आत्मदहन करण्यात येणार आहे . सदरील निवदनावर सरपंच मुकुंद कनसे सह राहुल छंदरराव डिकले , ज्योतिराम सुखदेव वाघमारे, सुरज उत्तम गालफाडे , इजाज बद्रोदिन शेख यांच्या सह्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!