वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
खजना विहिरी जवळील बीड बायपास रोडच्या छत्रपती संभाजी चौकात एका मोटार सायकलीला टेम्पोने चिरडून झालेल्या भीषण अपघातात बांधकाम मिस्त्री व मजुर महिला यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यातील बांधकाम मिस्त्रीवर त्यांच्या जन्मगावी केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथे रात्री अंत्यविधी करण्यात आला.
.

केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील रहिवाशी असलेले कालिदास विठ्ठल जाधव वय (३८ वर्ष) व त्यांच्या सोबत काम करीत असलेली महिला मजूर अनिता भारत सरपते रा. धानोरा रोड, बीड हे हे बीड येथे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करीत होते. दि. १२ ऑक्टोबर रोजी ते मांजरसुंबा येथे मोटार सायकल क्र (एम एच-२३/एल-१५८४) वरून कामावर जात होते. दुपारी १:३० वा. च्या दरम्यान खजाना विहीरी जवळील बीड बायपास रोडवरील छत्रपती संभाजी चौकात त्यांना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पो क्र. ( एम एच-१५/एफ व्ही-१८४७) ने चिरडले.
हा अपघात एवढा गंभीर होता की, अपघातातील दुचाकी आणि ते दोघे बऱ्याच अंतरा पर्यंत टेम्पोला अडकून फरफटत गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृतांपैकी कालिदास विठ्ठल जाधव यांच्या मृतदेहावर रात्री १०:०० वा. त्यांच्या गावी शेलगाव गांजी ता. केज येथील लोखंडे वस्ती येथे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!