आपला बीड जिल्हाआपले केजनिवडणुक

डॉ अंजलीताई घाडगे यांनी पुकारला एल्गार … मी लढणार आणि जनतेच्या आशीर्वादाने जिंकणार

केज विधानसभेचा विकास करण्यास कटिबद्ध

डॉ. अंजलीताई घाडगे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला आत्मविश्वास व्यक्त

केज । प्रतिनिधी

केज विधानसभा मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महवुकास आघाडी कडून निवडणूक लढविणार असून निवडून येण्याचा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी हितगुज साधताना केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या के ज विधान सभेच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांनी दिनांक ९ ऑक्टोबर रोजी केज येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष राधाताई सकपाळ, केज नगर पंचायतचे माजी सभापती आणि खा. बजरंग सोनवणे यांचे निकटवर्तीय कपिल मस्के हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई घाडगे म्हणाल्या की, अनेक वर्ष केज मतदार संघात एकच परिवारात सत्तेत आहे. मात्र या मतदार संघाचा विकास मात्र ते करू शकले नाहीत. अशा नाकर्त्या आमदारांना पुन्हा मतदार स्वीकारणार नाहीत. तसेच वारंवार एकाच घरात सत्ता देण्याच्या मनस्थितीत येथील मतदार नाही. त्यांना मतदार संघात बदल हवा आहे. ज्या प्रमाणे लोकसभेला राज्यातील आणि जिल्ह्यातील मतदारांनी निवडणूक हातात घेतली आणि बीड जिल्ह्यातून धनशक्ती आणि दादागिरी मोडीत काढली. त्याच प्रमाणे आता शरदचंद्र पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते नाना नाना पटोले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आ. संदीप भैय्या क्षिरसागर यांच्या विचारांचा उमेदवार म्हणुनी विधान सभेच्या निवडणुकीत सामोरे जावून निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यकर्ता मेळाव्याला केज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख महिला आघाडीसह पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!