आपला बीड जिल्हा

पैठण (सा). येथील शोभेची दारू बनविणारा कारखाना आगीत भस्मसात.

मनुष्यहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील पैठण (सा.) येथील शेख इस्माईल यांचा पात्रा शिवारात सर्वे नंबर ८ मध्ये शोभेच्या दारू बनवण्याचा कारखाना असून दिनांक ३० रोजी रात्री ९.००ते ९.३० च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला आहे. रात्री स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवित हानी टळली

असली तरी कारखान्याचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून फटाके बनवायचे काम चालू आहे. सदरील कारखान्याचे मालक घटना घडली त्यावेळेस तेथेच असल्याचे कळते. आग लागतात ते ते बाहेर पडले. अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याने सर्वत्र आग पसरली. कारखाना मालकाने आग विझवणाचा प्रयत्न केला परंतु तेथे आग भिजवायचे कोणतेही साहित्य नव्हते.

या स्फोटाची तीव्रता एवढी होती या ठिकाणी असलेले पत्र्याचे शेड व इतर साहित्य जळून खाक झाले.

सदरील घटना दिवसा घडली असती खूप मोठा अनार्थ झाला असता.

याबाबत प्रशासनाकडून कसलीही अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!