केज । प्रतिनिधी
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने पवनराजे इंग्लिश स्कूल, केज येथे विविध योगासने व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर योग शिक्षक प्रा. युवराज मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, भुजंगासन, त्रिकोणासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम आदी योगासने विद्यार्थ्यांना करून दाखवण्यात आली.योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगण्यात आले. योगामुळे एकाग्रता, मनःशांती व तणावमुक्त जीवनशैलीचा मार्ग खुला होतो, असे यावेळी प्रिन्सिंपल अशोक मस्के सर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन संख्येचे अध्यक्ष खंडेराव चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांनी योगाचा नियमित सराव करण्याचा संकल्प केला. यावेळी घुले सर , विशास सिरसट सर ,डि.एस चौरे सर , भांगे सर , सिद्धार्थ शिनगारे सर यांच्यासह आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!