वादळवार्ता वार्तांकन – केज
केज येथील शारदा इंग्लिश स्कूल ची विद्यार्थीनी जागृती अमरजीत तिवारी व समृद्धी काळे हिने रायफल शूटिंग 14 वर्ष वयोगट स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्य क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय पातळीवरील रायफल शूटिंग 14 वर्ष वयोगटातील स्पर्धेत शारदा इंग्लिश स्कूल केज ची धारूर येथील विद्यार्थिनी जागृती अमरजीत तिवारी व केज येथील समृद्धी काळे हिने जिल्हास्तरा वर प्रथम व औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय स्तरावर ही प्रथम क्रमांक मिळवला असल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे तिला शाळेच्या क्रीडा शिक्षक, व इतर शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल दोघींचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील राज्यस्तरावर जाणारी धारूर येथील पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख रमेशराव आडसकर, अर्चनाताई आडसकर, शाळेचे प्राचार्य मिश्रा एस एम, पी एम देशमुख, क्रिडा शिक्षिका वर्षा दिक्कत, क्रिडा शिक्षक सोळंके सर , अनिल स्वामी सर , बाबर सर , काळे सर , ताटे सर , व केज, धारूर येथील अनेकांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.