वादळवार्ता – केज
या बाबत वृत्त असे कि केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ परिसरामध्ये देशी/विदेशी दारू अवैध धंद्यावर कार्यवाही करणेबाबत शोध घेत असताना प्रवीण हॉटेल देवगाव फाटा येथे अनाधिकृत विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून 10.50 वा. केज पोलिसांनी छापा मारला असता हॉटेल चालक महादेव ज्ञानोबा मुंडे राहणार वडमाऊली दहिफळ हा तेथन पळून गेला.
सदर हॉटेलचे काउंटर चेक केले असता काउंटर मध्ये वायरच्या पिशवीत देशी-विदेशी दारूच्या 44 बॉटल किंमती 4740 रुपयांच्या माल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणात पोलीस स्टेशन केज गुरन 225/23 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोह/रामदास तांदळे याचे कडे देण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस स्टेशन केजचे प्रभारी बाळासाहेब पवार यांचे मार्गदर्शना खाली पीएसआय शिंदे, पीएसआय पाटिल सहा.पोलीस उपनिरीक्षक राम यादव ,पोना दिलीप गित्ते,पोलीस स्टेशन केज यांनी केली .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!