आपला बीड जिल्हाआपले केजशिक्षण
पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त ध्वाजारोहणाचा कार्यक्रम संपन्न…

वादळवार्ता – केज

वादळवार्ता – केज
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्ष-उल्हासाच्या वातावरणा मध्ये साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन बेलगावचे माजी सरपंच तुळशीराम घुले तर प्रमुख पाहुणे म्हणुन पवनराजे इंग्लिश स्कूल तथा कै. राम चौरे प्रा.माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्ष सौ. प्रणिता खंडेराव चौरे, उमेश चौरे, चितांमण काळे ,गौरख भांगे , गंगाधर नेहरकर , महादेव गिरी हे होते. प्रथम:ता मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून तिरंगी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी परेड सादर केली. इयत्ता १० वी च्या कु. विदिशा गायकवाड , कु.अश्विनी जाधव, कु.भक्ति भांगे व कु. स्नेहल यांनी स्वागतगित सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तथा पालकवर्ग यांचा स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्रिन्सिपल अशोक मस्के यांनी केले .
यानंतर एलकेजी ते इयत्ता दहावीच्या एकुण १८० विद्यार्थ्यानी आपले मनोगते व्यक्त केली . अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर पवनराजे इंग्लिश स्कूल मध्ये भर दिला जातो असे तुळशीराम घुले यांनी सांगीतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय सर यांनी केले तर आभार घुले सर यांनी मानले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.