आपला बीड जिल्हाआपले केज

सावधान ! रस्त्यावरचा फलक बघुन या गावाला कोणी जाताल ? 

एक असं गाव जे फक्त फलकावर दिसेल

वादळवार्ता – केज

महाराष्ट्रतील रस्त्यांचे रुंदीकरण , मजबुतीकरण मोठ्या प्रमाणात पुर्णत्वास जात असताना दिसत आहेत. केज शहरामधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तीन वर्षापासुन अतिशय मंद गतीने होत असलेल्याचे चित्र केज शहरातील नागरीकांनी पाहीले आहे.

बीड – अंबाजोगाई रस्त्याचे कंत्राट एच.पी.एम. कंपनीकडे तर माजलगाव ते कळंब या रस्त्याचे कंत्राट मेघा कंपनीकडे आहे . केज- कळंब रोडवर मेघा कंपनीने रस्त्याच्या बाजुला गावांचे दिशादर्शक फलक उभे केले आहेत. मात्र दिशादर्शक फलकावर मेघा कंपनीने एक असे गाव निर्माण केले कि जे या परिसरात तर शोधुनही सापडणार नाही , मात्र अंदाज लावुन शोधले तर सापडेल.

होय त्या गावाचे नाव आहे कल्लाम नविन माणसाला कळणार नाही मात्र केज शहर तालुक्यातील लोकांना अंदाजावर या गावाचे नाव ओळखता येईल ते म्हणजे कळंब.

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर मेघा कंपनीने असे गडबडीत टाकलेली नावे जर लवकरच बदलली गेली नाहीत तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहणानां मात्र यामुळे जायचे कोठे हे कळणार नाही .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!