आपला बीड जिल्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त केज येथे शालेय विद्यार्थ्यांची रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथे शालेय विद्यार्थ्यांची रॅली उत्साहात निघााली.

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
================================

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा या अंतर्गत बुधवारी केज येथे एक भारत, श्रेष्ठ भारत व जल ही जीवन या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी, विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या वेषभूशेत केज शहरातून रॅली काढून एकात्मतेचे दर्शन घडवले. जल ही जीवन ,पाणी आडवा पाणी जिरवा,नदी पुनरुज्जीवन असे विविध घोष वाक्याचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. केज शहरातील शाळेसह ग्रामीण भागातील शाळांनीही या रॅलीत सहभाग नोंदवला.

               विद्यार्थ्यांनी ,भारतमाता,राष्ट्रपिता महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,मराठा बटालियन, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, यांच्या सह विविध राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषा सकारल्या.

 या वेळी भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, व सुनील आबा गलांडेपाटील , भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार,वैद्यकीय आघाडीचे जिल्हाअध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, युवा नेते राहुल गदळे, सुनील घोळवे, भाजपा उपाध्यक्ष अनुराथ शिंदे,खदीर खुरेशी,दगडू दळवी,लिंबराज फरके,संतोष जाधव,दत्ता सावंत, वसंत सोनवणे, दिलीप गायकवाड, डॉ महेंद्र राऊत, अरुण काळे, रवींद्र गलांडे यांचे सह भाजपा कार्यकर्ते शिक्षक, व कर्मचारी उपस्थित होते ,सर्वांचे आभार भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी मानले .

वेषभुषा स्पर्धेत कर्मवीर विद्यालय प्रथम प्रा. हनुमंत भोसले, प्राचार्य हनुमंत सौदागर आणि हनुमंत घाडगे यांच्या निवड समितीने परीक्षकाचे काम पहिले.

यात कर्मवीर विद्यालय चिंचोली माळी (प्रथम ) स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज (द्वितीय) वसुंधरा आश्रम शाळा केज (तृतीय ) प्रोत्साहन पर बक्षीस साने गुरुजी निवासी ऊसतोड कामगार विद्यालय व चाटे इंग्लिश स्कुल केज यांना भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नायब तहसीलदार लक्ष्मण धस व सचिन देशपांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!