आपला बीड जिल्हाआपले केज

निलेश राणे हाजीर हो sssss!

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण

वादळवार्ता – गौतम बचुटे

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सन २०२० मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी माजी खा. निलेश राणे हे दि. २९ मार्च रोजी केज न्यायालयात हजर राहणार आहेत.

या बाबतची माहिती अशी की, सन २०२० केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध माजी खासदार निलेश राणे आणि केज तालुक्यातील दोघे विवेक अंबाड, रा. लाडेगाव आणि रोहन चव्हाण रा. पळसखेडा यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये शत्रुत्व, व्देषभाव निर्माण होईल; अशा पोस्ट सोशल मिडियावर टाकल्या होत्या. म्हणून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केली होती.

त्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, लाडेगाव ता. केज आणि विवेक चव्हाण पळसखेडा ता. केज यांच्या विरुद्ध ऑक्टोबर २०२० रोजी गु.र.नं. ४३२/२०२० भा.दं.वि. ५०५ (२) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन पोळीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी तपास करून दोषारोप न्यायालयात पाठविले.

दरम्यान उद्या दि. २९ मार्च रोजी माजी खा निलेश राणे हे केज न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यांच्या वतीने ॲड. तपसे हे काम पहात आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!