आपला बीड जिल्हा

केज बीड रोडवर मस्साजोग जवळ भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि राम कुलकर्णी हे प्रवास करीत असलेल्या गाडीवर रिक्षा पलटी झाला : दोघेही सुखरूप

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कार समोर मातीच्या ढिगारा चुकवीत असताना रिक्षाने पलटी झाला आणि त्यामुळे कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्या सोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही.

शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि दुसरे प्रवक्ते राम कुलकर्णी हे एका कार्यक्रमा निमित्त बीड-केज रोडने आंबेजोगाईकडे जात असताना सायंकाळी ८;३० वा. च्या दरम्यान मस्साजोग येथील एका पेट्रोल पंपा जवळ रोड वरील वाळूचा ढिगारा चुकविण्याच्या प्रयत्नात असलेला रिक्षा क्र. ( एम एच-२३/एक्स-३३४५) त्यांच्या गाडीवर पलटी झाला. या अपघातात माधव भंडारी यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून रिक्षा बाजूला पलटी झाला. यात सुदैवाने माधव भंडारी आणि राम कुलकर्णी हे सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच रिक्षातील प्रवासी सुखरूप असून त्याचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर नेकनुर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यान अपघातानंतर भाजप प्रवक्ते माधव भंडारी व राम कुलकर्णी यांचा भाजपाचे नेते रमाकांत मुंडे यांच्या पेट्रोल पंपावर रमाकांत मुंडे, दत्ता धस, आणि शेषराव कसबे यांनी त्यांचा सत्कार केला; असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, संतोष गिते, बाळासाहेब अहंकारे यांना घटनास्थळी रवाना केले. पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!