वादळवार्ता वार्तांकन – केज
शेतातील विहीरीमध्ये पाणी आनण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहीरीमध्ये पाय घसरून, पाण्यात बुडुन मृत्यु केज तालुक्यातील केळगाव येथे झाला आहे.
सविस्तर असे कि केज तालुक्यातील केळगाव येथे दि.10 अक्टोबंर रोजी शेतातील सर्वे न. 29,30 येथील विहिरीमध्ये पाणी आनन्यासाठी अजंली उर्फ ठकुबाई ज्ञानदेव दराडे वय वर्ष 27 गेल्या असता पाय घसरून विहीरीमध्ये पडुन पाण्यामध्ये बुडुन मृत्यु झाला आहे. यांची केज पोलीस ठाण्यात आकृस्मित मृत्युची नोंद झाली आहे .
पुढील तपास सपोनि शंकर वाघमोडे याच्या आदेशाने पोना. काळकुटे हे करत आहेत.