आपले केज

केज पोलिसांची अवैद्य दारुविक्री करणाऱ्या धाब्यावर धाड !

वादळवार्ता वार्तांकन – केज

आज रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की केज ते चिंचोली माळी जाणारा रोडवर चिंचोली माळी शिवारात जगदंबा धाब्याचा मालक हा आपले स्वतःचे फायदा करता देशी-विदेशी दारू जवळ बाळगून चोरटी विक्री करीत आहे अशी खत्रीलायक माहिती मिळाल्याने सदरची माहिती त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांना देऊन सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असतां सदर ठिकाणी दारू विक्री करणारा इसम नामे दीपक शेषराव गायकवाड राहणार चिंचोली माळी हा जागीच मिळून आला त्याचे ताब्यातून देशी विदेशी व बियरच्या बाटल्या असा एकूण 5595 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून

त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे केज येते पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांचे फिर्याद वरून गुन्हा दाखल झाला आहे सदरची कारवाई मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मुकुंद ढाकणे ,बालाजी दराडे बाबासाहेब बांगर, राजवीर वंजारे महिला पोलीस नाईक आशा चौरे यांनी केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!