दैनिक वादळ वार्ता/ केज
केज येथील पत्रकाराला पोलिसानंकडून मारहाण करण्यात आली आहे . यामुळे केज येथील पत्रकारांनी एकत्र येत केजचे तहसिलदार अभिजीत जगताप यांना निवेदन देण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत असे कि केज शहरात पत्रकार बाळासाहेब जाधव हे तीन चाकी रिक्षा चालवून आपला उदनिर्वाह करतात तसेच एमसीएन न्युज चॅनलचे केज तालुका प्रतिनीधी म्हणुन काम करतात त्यामाध्यमातून सामाजिक प्रश्न मांडतात मात्र दि . २० मार्च रोजी रात्री ०८ वाजन्याच्या दरम्यान न्यायालयाच्या समोर रस्त्याच्या बाजुला रिक्षा मध्ये बसुन आपल्या मोबाईल मध्ये बातमी तयार करत होते. सदरील ठिकाणी साध्या ड्रेसवर केज पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार त्या ठिकाणी विष प्यालेल्या महिलेस दवाखान्यात घेऊन चल असे म्हणाले नंतर पत्रकार बाळासाहेब जाधव यांनी मी बातमी तयार करत असुन आपण इतर रिक्षा पहा म्हटल्यावर त्यांनी बाळासाहेब जाधव यांना शिवीगाळ करुन मारहाण केली व गचुऱ्याला धरुन पोलीस ठाणे केज येथे रात्री ११ वाजेपर्यंत बसवुन ठेवले. व त्यांना माणसीक त्रास व शारिरीक त्रास दिला म्हणून सदरील पत्रकाराला हाणमार करण्याऱ्या पोलीसांवर कायदेशिर कारवाई करुन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. या मागणीचे निवेदन केज तहसिल कार्यालयाचे तहसिलदार अभिजित जगताप यांना देण्यात आले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!