आपले केज

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,केज तालुका कार्यकारिणी जाहीर

केज/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पञकार संघाची केज तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पञकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, उपाध्यक्षपदी प्रदीप गायकवाड, सचिव पदी विजय बिक्कड, सहसचिव पदी आप्पा सारूक,कार्याध्यक्षपदी नंदुलाल मिसाळ,तर कोषाध्यक्षपदी विवेक बनसोड,प्रसिद्धी प्रमुख पदी पांडुरंग कसबे,डिजिटल मीडिया अध्यक्षपदी विश्वास राऊत,पत्रकार विरोधी हल्ला समिती अध्यक्षपदी सचिन साखरे,तसेच कायदेविषयक सल्लागार पदी ॲड.सतीश मस्के यांची निवड करण्यात आली आहे.

संघाची बैठक मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. नवीन कार्यकारिणीला पत्रकारांच्या हित संबंधा साठी काम करण्याची मोठी जबाबदारीसोपवली आहे.ही निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेख आयेशा मॕडम संपादक लोकजगत यांची उपस्थिती होती.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक बनसोडे यांनी केले नुतन पदाधिकारी यांचे स्वागत महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांनी केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!